पोलीस शिपाई चालक निवड यादी प्रसिद्ध | police constable driver selection list 2021| police bharti 2021

पोलीस अधीक्षक, भंडारा यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलीस शिपाई चालक 56 पदासाठी घेण्यात आलेल्या शारीरीक मैदाणी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये जे उमेदवार विहीत गुणांनी उत्तीर्ण झाले असून, सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र ठरले आहे, अशा उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी यादी तयार करण्यात आली असून, या सोबत संकेतस्थळ www.bhandarapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यांत येत आहे. सदर प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी याबाबत उमेदवारांना आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द.
केल्यापासून दिनांक 01/04/2023 चे रात्री 10:00 वाजे पर्यन्त sp.bhandara@mahapolice.gov.in या ईमेल वर किंवा पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील दुरध्वनी क्र. 07184 252400 मो.क. 9405831100 वर, तसेच नियंत्रण कक्ष पोलीस अधिक्षक कार्यालय, भंडारा येथे प्रत्यक्ष हजर राहुन आक्षेप/ हरकत नोंदवावे जर विहित मुदतीत कोणत्याही उमेदवारांचे आक्षेप प्राप्त न झाल्यास, काहीही आक्षेप नाही, असे गृहीत धरुन पुढील कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment