सातबारा डाऊनलोड करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात फ्री मध्ये 7/12 utara

712 digital नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेचदा आपण कुठे बाहेरगावी असतो. तर आपल्याला आपल्या 7/12 utara सातबाराची गरज पडते. आणि तो सातबारा आपल्याकडे नसतो तर तो सातबारा तुमच्या मोबाईलवर कसा डाउनलोड करावा हे आज आपण लेखांमध्ये पाहणार.

मित्रांनो कुठलाही सातबारा तुम्हाला सर्वे नंबर माहित असो नसो किंवा तुम्हाला फक्त त्या व्यक्तीचं नाव माहीत असो तर तुम्ही फक्त नावावरून किंवा सर्वे नंबर वरून तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचाही सातबारा डाऊनलोड करू शकता तो कसा डाऊनलोड करायचा ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या वाचा .

तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला 7/12 utara डाऊनलोड करण्यासाठी महाभूमीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊ शकता येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा एरिया निवडायचा आहे.

सातबारा डाउनलोड करण्यासाठी
येथे क्लीक करा 

आणि त्यानंतर तुम्हाला सातबाराचा सर्वे क्रमांक तर माहीत असेल. तर सर्वे क्रमांक टाकून तुम्ही सातबारा डाऊनलोड करू शकता. किंवा जर सर्वे क्रमांक तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नावावरून आडनावावरून किंवा मधल्या नावावरून सुद्धा सातबारा डाऊनलोड करू शकता. डाऊनलोड करताना तुम्हाला तो एक मोबाईल क्रमांक विचारणार त्या मोबाईल नंबर वर कुठल्याही प्रकारचे ओटीपी जात नाही. डाऊनलोड झालेला सातबारा हा फक्त तुम्ही पाहायचा उपयोगात आणू शकता. हा डाऊनलोड झालेला सातबारा तुम्ही कुठल्याही कार्यालयीन उपयोगात आणू शकत नाही. मित्रांनो ही जर पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा

Leave a Comment