धरणातला गाळ शेतात टाकण्यासाठी सरकार देणार अनुदान असा करा अर्ज

Jalyukt shivar 2.0 Yojana धरणातील गाळ काढून तो आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे बरेचसे धरण आणि तलाव हे कमी प्रमाणात भरलेले आहेत आणि त्यांच्यातील गाळ उघडा पडलेला आहे. तर हा गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी आपली शेताची सुपीकता वाढवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे.

 

तर ते अनुदानाचा लाभ कसा घ्यावा ते आज आपण लेखांमध्ये पाहणार आहोत.धरणामध्ये असलेलं गाळ हा कुजून सुपीक झालेला असतो. हा काळ आपल्या शेतीमध्ये टाकल्यावर खूप उपयोगी ठरतो. तसेच ठेवून महाराष्ट्र शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेची सुरुवात केली आहे. आणि ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 

शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

 

गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार या योजनेचा लाभ आतापर्यंत जवळपास 6780 होऊन जास्त शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रत्येक घनमीटर गाळ काढण्यासाठी प्रति 31 रुपये घनमीटर यानुसार खर्च सरकार देते.

 

व अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांच्या मर्यादेत म्हणजेच 35 घनमीटर याप्रमाणे सरकार पैसे देते या योजनेला 2023 ते 24 या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार 2.0 असं सुद्धा म्हणतात.या योजनेमध्ये येणाऱ्या कामाचे जे मूल्यमापन होते ते अवनी या ॲपच्या द्वारे करण्यात येते यानुसार एकूण 34 जिल्ह्यांतर्गत अंतिम यादी तयार करण्यात आलेली आहे.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

 

त्यानुसार बरेचसे जलसाठे नियमित केल्या गेलेले आहेत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Comment