Maharashtra Police Bharti Latest Update पोलीस भरती 17471 पदभरती चा GR शासन निर्णय

Maharashtra Police Bharti Latest Update  सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत.

 

वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि. ३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. Maharashtra Police Bharti Latest Update 

 

तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र. २ येथील दि. ०४.०५.२०२२ रोजीच्या शासननिर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.

शासन निर्णय GR पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्र.३ येथील दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा टि.सी.एस.-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) व आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने (Computer Programme Based test/ Examination) घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Comment