Namo Kisan Yojana Installment: नमो किसान योजनेचा हप्ता 6000 बँक खात्यात जमा, यादीत नाव चेक

Cm किसान योजना : राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे, जाणून घेऊया शेतकरी महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी कधी सुरू होणार, शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता कधी मिळणार

केंद्र सरकार ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देत आहे. यासाठी दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजारांचा हप्ता जमा होतो. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने गेल्या अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना लागू करण्याची घोषणा केली.

यादीतील नाव पहाण्यासाठी 

येथे क्लिक पाहा 

केंद्र सरकारच्या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर पडली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता नव्हती.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’साठी ४ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ ८७ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

“राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.” या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर स्वतंत्र पुस्तिका विकसित करण्यात येणार असल्याचेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

Leave a Comment