pm suryoday yojana 2024 मोफत वीज मिळवा 18000 रु पर्यंत होणार फायदा असा करा ऑनलाईन अर्ज

फेब्रुवारी महिन्यात, निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची (PM Suryoday Yojana) घोषणा करण्यात आली होती. त्यातील ग्राहकांना त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनल लावल्यास 300 युनिट विद्युत मोफत मिळणार आहे. त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा लाभ होईल. पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. सरकारने या मोफत विद्युत योजनेला पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) असे नाव दिले आहे. या योजनेत कसे अर्ज करावे, यासाठी कोणती प्रक्रिया आहे, याविषयी अनेकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. जाणून घ्या, ही योजना काय आहे ?

समजा, तुम्ही दर महिन्याला 400 युनिट विद्युत वापरता आणि तुमचे विद्युतबिल ₹2,000 आहे. तुम्ही तुमच्या घरात सोलर पॅनल लावल्यास आणि पीएम सूर्य घर योजनेसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला दर महिन्याला 300 युनिट विद्युत मोफत मिळेल. याचा अर्थ तुम्हाला आता फक्त 100 युनिट विद्युतबिलासाठी पैसे द्यावे लागतील. यामुळे तुमच्या विद्युतबिलामध्ये ₹1,600 पर्यंत बचत होईल. अर्ज करण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

असा करा अर्ज
https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा
या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा
या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल
भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लावतील

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment