Register on Hurti App Get Subsidy for Wells हर्टी ऍप वर नोंदणी करा विहिरीसाठी अनुदान मिळवा

Register on Hurti App Get Subsidy for Wells हर्टी ऍप वर नोंदणी करा विहिरीसाठी अनुदान मिळवा ! मागेल त्याला विहीर योजना : ‘मग्रारोहयो’ तून विहिरीचे काम निसर्गाच्या असंतुलनामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, शेती-व्यवसाय संकटात आला आहे. जल कमी असल्याने बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. पिकांना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

 

त्यामुळे कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी आणि त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा, तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून सिंचन विहीर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शासनाने मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. MAHA-EGS Horticulture/Well App

 

अनुदान किती ? सिंचन विहिरीच्या अनुदानात गत दोन वर्षांपासून वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक लाभार्थ्याला चार लाख रुपयांचे अनुदान सिंचन विहिरीसाठी दिले जात आहे. शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून शासनाने मागेल त्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर देण्याचा निर्णय घेतला.

 

विहारीसाठी अर्ज करण्यासाठी
येथे क्लीक करा 

 

योजनेच्या लाभाची प्रक्रियाही सुलभ केली असून, आता हर्टी ऍप वर विहिरीचा प्रस्ताव दाखल करता येत आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीत दाखल करावा लागतो. सिंचन विहीर योजनेंतर्गत कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे, हा त्याचा प्रमुख मोठा फायदा आहे. यामधून दुर्बल शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती देखील होणार आहे.

 

हर्टी ऍप काय आहे शेतकऱ्यांना सहजरीत्या सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता यावा म्हणून शासनाने ही हर्टी ऍप सुरू केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमधून सिंचन विहीर देण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ विहिरींचे उद्दिष्ट दिले आहे.

 

योजनेचे निकष काय ? सिंचन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम अल्पभूधारक असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे सातबारा उतारा, ८ अ उतारा, जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.

Leave a Comment