Zilla Parishad Nagpur: जिल्हा परिषद नागपुरात १४२ पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा!

Zilla Parishad : जिल्हा परिषद नागपुरात विविध पदांच्या १४२ जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या पदांसाठी आवश्यक पात्रता असलेल्या उमेदवारांकडून विहित मुदतीत ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (जिल्हा परिषद नागपुर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर विविध पदांसाठी भरती, पदांची संख्या-१४२) पद, पदांची संख्या, पात्रता यासंबंधीची सविस्तर भरती जाहिरात खालीलप्रमाणे पाहू..

अ.क्र पदनाम पदांची संख्या
01. वैद्यकीय अधिकारी 48
02. स्टाफ नर्स 45
03. MPW / पुरुष 49
एकुण पदांची संख्या 142

 

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता (शिक्षण पात्रता):

पद क्रमांक ०१ साठी: एमबीबीएस / बीएएमएस पात्रता आवश्यक असेल.

पद क्रमांक ०२ साठी: उक्त पदासाठी उमेदवारांनी जनरल नर्सिंग कोर्स / बीएससी नर्सिंग पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.

पद क्र.03 साठी: उक्त पदासाठी उमेदवारांनी उच्च माध्यमिक (12वी विज्ञान) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा विज्ञान प्रवाहातील समकक्ष पात्रता असावी.

वयोमर्यादा: या पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय 38 वर्षे असावे. त्यांच्यातील मागासलेपणासाठी 05 वर्षे वयाची सूट दिली जाईल.

वेतनमान: रु. 18,000-60,000/- प्रति महिना..

अर्ज प्रक्रिया / अर्ज फी: जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र असलेल्या उमेदवारांनी 28.02.2024 पर्यंत राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाइन नागपूर या पत्त्यावर अर्ज सादर करावेत. सदर भरती प्रक्रियेसाठी 150/- परीक्षा शुल्क आणि मागास प्रवर्गासाठी रु.100/- परीक्षा शुल्क आकारले जाईल.

 

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

 

Leave a Comment