आरोग्य विभागात कुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती लगेच अर्ज करा Arogya Vibhag Bharti

Arogya Vibhag Bharti आरोग्य विभागात कुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती लगेच अर्ज करा. राष्ट्रीय आयुष अभियान कंत्राटी पदभरती जाहीरात २०२३ – २४ क्र.८ राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धाराशिव सार्वजनिक आरोग्य विभाग राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रम मधील खालील दोन पदाची पदभरती करणेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदरील पदे हि कंत्राटी स्वरुपाची आणि करार तत्वावरील व एकत्रित मानधनावरील आहेत. तरी पात्र ठरत असलेल्या उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहीरातीमधील पदे ही राज्य शासनाची नियमीतची पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील आहेत. सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु राहणार नाहीत.

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. जाहीरातीमधील रिक्त पदांच्या संख्येत व सामाजिक आरक्षणामध्ये कमी-जास्त बदल होऊ शकतो तसेच रिक्त पदांच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो यानुसार पदभरती स्थगीत करणे / रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार निवड समिती व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांनी राखून ठेवले आहेत.

Arogya Vibhag Bharti
Arogya Vibhag Bharti

याबाबत- कोणालाही कसल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. सदरील जाहीरात ही प्रकल्प अंमलबजावणी आरखडा मंजुरीनुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त नसावे. (खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 43 वर्षे) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांचेसाठी 5 वर्ष वय शिथील राहील.

तथापि कागदपत्रे तपासणी दरम्यान सद्य स्थितीत कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीचे तशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. अर्जदार हा शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा. अर्जात हेतुपुरस्कार खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवुन ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा खोटे, बनवट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करणेचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांना राहतील.

तसेच विहीत केलेल्या अर्हतेच्या अटी पुर्ण न करणारा अथवा गैरवर्तणुक करणारा उमेदवार कोणत्याही टप्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. सादर केलेली कागदपत्रे बनावट किंवा खोटी असल्याचे आढळुन आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अर्जामधील माहिती व मुळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये फरक आढळुन आल्यास अर्जामधील माहिती अनधिकृत समजण्यात येईल. अर्जामधील माहिती संदर्भात कागदोपत्री पुरावे सादर करु न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रदद करण्यात येईल.

आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या प्रमाणपत्रामध्ये गुणाऐवजी श्रेणी पध्दत असल्यास संबंधीत संस्थेकडुन त्याचे गुणांमध्ये रुपांतर करुन ते प्रमाणित करुन घ्यावे व त्याची मुळ प्रत अर्जासोबत सादर करावी. एस.एस.सी किंवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे अर्ज इंग्रजीमध्ये भरावा. नाव बदलेले असल्यास याबाबत आवश्यक कागदपत्र सोबत सादर करावीत.  उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव, जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी माहिती काळजीपुर्वक भरावी.

अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराची पात्रता / अपात्रता तपासण्यात येईल व त्या आधारे त्याचा पुढील निवड प्रक्रियेमध्ये समावेश करण्यात येईल. उमेदवाराचा अर्ज स्विकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या कंत्राटी पदासाठी पात्र आहे असा अर्थ होणार नाही. निवड प्रक्रियेदरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवडीनंतर अर्जदार विहीत अर्हता धारण करीत नसल्याचे किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.

उपरोक्त पदापैकी तांत्रिक पदांकरीता संबंधीत कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र / कौन्सिलचे रजिस्ट्रेशनचे नुतनीकरण प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. ज्या पदाकरीता अर्ज सादर केला आले त्या पदांशी संबंधीत असलेला अनुभव ग्राहय धरण्यात येईल. या व्यतीरिक्त अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही. संबंधीत पदाशी निगडीत खाजगी / शासकिय अनुभवाचा विचार पदभरती / निवड प्रक्रियेत करण्यात येईल. ज्या पदाकरीता अनुभव आवश्यक आहे अशा पदाकरीता अनुभव असलेले उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झालेस अनुभव अट शिथील करणे बाबत आवश्यक निर्णय घेण्याचा अधिकार निवड समितीस राहील. ज्या उमेदवारांनी यापुर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय / समाज कल्याण / आदिवासी विकास प्रकल्प व इतर कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.

Leave a Comment