Buldhana nuksan bharpai बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप सुरू शासन निर्णय पहा

Buldhana nuksan bharpai मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर 2023 च्या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेला नुकसानाची भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरू झालेले आहे. 

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

Buldhana नुकसान भरपाई वाटपाचा जीआर हा फेब्रुवारीमध्येच काढण्यात आलेला होता आणि या नुकसान भरपाईसाठी लागणारा निधी सुद्धा फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आलेला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती निवडणुका जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी वितरित केल्यानंतर सरकारला सुद्धा याचा फायदा होईल त्याच अनुषंगाने आज पासून या निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यासाठी सुरू झालेला आहे.

यादीमध्ये नाव पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

मित्रांनो हा जीआर सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेत पिके व शेतजमिनीच्या नुकसान करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक चार महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाकडून दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी काढण्यात आलेला होता.

Buldhana nuksan bharpai
Buldhana nuksan bharpai

मित्रांनो शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा पहा जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीचे व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्या आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भातील क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो इंडिया आणि एचडीएफच्या निश्चित असलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे.

त्यासाठी एकूण सहा कोटी 47 लाख 41 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो पाहू शकता अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासाठी हा सहा कोटी 47 लाख आणि 41 हजार रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये येथे दिलेला आहे ७५४९ हेक्टर एवढ्या क्षेत्राचा नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेला आहे. आणि बाधित शेतकरी संख्या पहा मित्रांनो 7899 एवढ्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. एकूण सहा कोटी 47 लाख 41 हजार रुपये एवढी मदत बुलढाणा जिल्ह्यातील 7899 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. मित्रांनो इंडिया आणि एचडी आर एफ च्या निकषानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रती हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहे आणि बागायत क्षेत्रासाठी 17 हजार रुपये हेक्टर अशा पद्धतीने या निधीचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून केलं जाणार आहे.

Leave a Comment