या OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार शासन निर्णय GR आला (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana)

इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले /घेणारे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून

आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१,६०० विद्यार्थ्यांकरिता “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास संदर्भिय दि.१३.१२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तथापि, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी निकष व इतर अटी-शर्ती ठरविण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती–क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले /घेणारे भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय GR पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

Leave a Comment