dushkal anudan payment दुष्काळ अनुदानाचे पैसे आले ! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

dushkal anudan payment शेतकरी मित्रांनो अखेर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली दुष्काळ अनुदानाचे पैसे ते वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याकडे पाठवण्यात आलेले आहेत. आता हे पैसे प्रत्येक तालुक्यानुसार वाटप केले जातील तालुक्याला पैसे आल्यानंतर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून म्हणजेच महसूल विभागाच्या माध्यमातून. आता प्रत्येक लाभार्थ्यांना जे लाभार्थी पात्र असणार आहेत किंवा जे शेतकरी पात्र असणार आहेत.

अशा पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट नंबर दिला जाईल म्हणजे केवायसी करण्याची यादी तलाठी कार्यालय असेल किंवा ग्रामसेवक कडे पाठवण्यात येईल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल. तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे केवायसी करून घेतल्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत.

मित्रांनो आता इलेक्शन जवळ आलेला आहे. यापूर्वी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. या संदर्भात पूर्वी सुद्धा आपण माहिती घेतली होती आता परत तुम्हाला या ठिकाणी वाटेल की आता सध्या आचारसंहिता चालू आहे. या आचारसंहितेमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित होणार नाही मित्रांनो असं नाही आहे.

सर्वप्रथम कारण यासाठी जीआर निघालेला आहे. मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे आणि जी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करायची होती ती निधी सुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी मंजूर करण्यात आलेली आहे. मंजूर झाल्याच्या नंतर पैसे वाटपाची प्रक्रिया जी काही करायची असते. जरी आचारसंहिता चालू असेल तरीसुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात.

कारण सर्व प्रोसेस आचारसंहितेच्या पूर्वी झालेला आहे. तुमच्या खात्यावरती इलेक्शन पूर्वी बहुतेक या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे कन्फर्म जमा होतील. काळजी करण्याची गरज नाही आता परत तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत मित्रांनो दुष्काळ अनुदानासाठी जे जिल्हे पात्र आहेत.

40 जिल्ह्याबद्दल आपण पूर्वीच माहिती घेतलेली आहे चाळीस तालुक्याबद्दल यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत. आता सर्व तुमच्या तालुका दुष्काळग्रस्त आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे का असं नाहीये सर्व शेतकऱ्यांना लाभ यामधून मिळणार नाहीये जर सरसकट तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांचे पंचनामे झाले असतील तरच सर्व लाभार्थ्यांना याची रक्कम जी आहे.

ती तुमच्या खात्यावरती वर्ग केली जातील परंतु आता तुमच्या गावांमध्ये दुष्काळ म्हणून पंचनामे करण्यात आलेले नाहीयेत मग अशा लाभार्थ्यांना पैसे मिळतील का ? उदाहरणार्थ तुमच्या गावातून 100 लोक आहेत त्या शंभर लोकांमधून जर वीस लोकांचा पंचनामा झालेली असेल तुमच्या शेती पिकांचा अतोनात झालेला आहे खरंच दुष्काळ तुमच्या शेतीवरती आलेला आहे.

अशा शेतकऱ्यांचा जर पंचनामे झाले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच हे पैसे जमा होतील. जर सरसकट दुष्काळ तुमच्या तालुक्याला घोषित करण्यात आलेला असेल तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे येतील जेव्हा तुमची केवायसी करण्याची यादी तुमच्या गावाकडे येतील तलाठी कडे येतील किंवा ग्रामपंचायतकडे येतील.

 

Leave a Comment