maharashtra board 10th 12th result news दहावी बारावीच्या निकाल संबंधी महत्त्वाची बातमी

maharashtra board 10th 12th result news

राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपल्या. दहावीचा केवळ एक पेपर राहिला आहे. सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न असून, एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपल्या. दहावीचा केवळ एक पेपर राहिला. सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न असून, एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केले आहे.

या महिन्यांमध्ये लागणार दहावी बारावीचा निकाल येथे क्लिक करा

maharashtra board 10th 12th result date 

महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत २१ ते १९ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली; तसेच एक ते २६ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. २६ मार्चला दहावीचा भूगोलचा पेपर होणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून दहावीच्या परीक्षेला १ लाख ८६ हजार ८१४; तर बारावीच्या परीक्षेला १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे. बारावीचे पेपर तपासण्यासाठी ६ हजार ६३० परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत. ११०५ मॉडरेटर आहेत. तसेच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी ७ हजार २९७ परीक्षक काम करत आहेत. मंडळाने प्रत्येक परीक्षकाला दोनशे पेपर तपासणीसाठी पाठवले आहेत.

maharashtra board 10th 12th latest news

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या. परिणामी, दहावी-बारावीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला. सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी, बारावीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याचे अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

Leave a Comment