ZP Bharti Dhule जिल्हा परिषद भरती 2024 | डेटा एन्ट्री ऑपरेटरची पदे |

ZP Bharti Dhule केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषदे अंतर्गत रिक्त असणारी डेटा एन्ट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरुपात पुढिल ११ महिन्याचे कालावधी करिता कंत्राटी पध्दतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक अटी पूर्ण करणा- या उमेदवारांचे अर्ज सोबत दिलेल्या विहित नमुन्यात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे येथे दि. 20-03-2024 पावेतो सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत समक्ष अथवा पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून स्विकारले जातील.

२.१ डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारास इ. १० वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इ.१२ वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात यावी. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला १० गुण बोनस देण्यात यावेत.

जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लीक करा 

२.२ अनु क्र.२.१ मध्ये विषद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परिक्षेकरीता एका पदासाठी गुणानुक्रमे १२ उमेदवार याप्रमाणे बोलावण्यात यावे. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग – ४० शब्द प्रति मिनिट आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. यासाठी सर्व मिळून १०० गुण देण्यात यावे. प्रस्तुत प्रात्यक्षिक परिक्षेमध्ये किमान ५० गुण प्राप्त होणारे उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटरर्स च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.

Leave a Comment