या 40 तालुक्यातील दुष्काळी अनुदान वाटप सुरू यादीत आपले नाव पहा Dushkal anudan yadi

Dushkal anudan yadi शासनाच्या माध्यमातून 40 दुष्काळी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला अनुदान हे Kyc केलेले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यमाने गंभीर स्वरूपाचा 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि याच भागातील शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 8500 रुपये या दराने नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आले आहे.  

ज्याच्या अंतर्गत 22 लाख 90 हजार पर्यंत शेतकऱ्यांसाठी 2400 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली होती. याच्यासाठी जानेवारी 2024 मध्ये एक GR निर्मित करून या नुकसान भरपाईच वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आले आहे.  

याच्या याद्या तयार झाल्यानंतर खरीप पिकांची e pik pahni केलेल्या जिरायत क्षेत्रासाठी जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना 8500  रुपये प्रति हेक्टर या दराने ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याच्यासाठी ज्या शेतकऱ्यांची Kyc झालेले आहे. असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचा वितरण सुरू झालेले आहे.   याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यांमध्ये अवकाळी पाऊस झालेला होता गारपीट झालेले आहे.

याच्यामुळे सुद्धा जवळजवळ 32 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा नुकसान झालेलं होतं याच्यासाठी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून 2240 कोटी रुपयांचा अनुदान मंजूर करण्यात आलेल्या अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या देखील आता अपलोड होत आहेत. याच्या अंतर्गत देखील ज्या शेतकऱ्यांची Kyc झालेले आहे. त्यांचा अनुदान येते आणि ज्या शेतकऱ्यांचे Kyc बाकी अशा शेतकऱ्यांच्या अपलोड होत आहेत.

याच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील याद्या सुद्धा आता अपलोड करण्यात आले आहे. याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, सिन्नर आणि येवला या तीन तालुक्याचा समावेश आहे 2 लाख 51 हजार 675 शेतकऱ्यांच्या पात्र करण्यात आले आहे.  

धुळे जिल्ह्यामधील शिंदखेडा नंदुरबार जिल्ह्यामधील नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव असे तीन जिल्ह्यामधील तीन तालुके आहेत आणि एकूण नाशिक विभागातील 4 लाख 54 हजार 896 शेतकरी. 

बुलढाणा जिल्ह्यामधून बुलढाणा आणि लोणार या दोन तालुक्याचा समावेश आहे ज्याच्यामधून 1 लाख 25 हजार 928 शेतकरी पात्र करण्यात आले आहेत. याच्या व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यासाठी सात कोटी रुपयांचा अनुदान हे अतिवृष्टीत जुलै 2023 साठी मंजूर करण्यात आलेल्या अमरावती विभागामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव हे दोन तालुके १ लाख ३६ हजार ३३३ शेतकरी 

जालना जिल्ह्यामध्ये पाच तालुक्याचा समावेश आहे भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा ज्याच्यामधून एक लाख 56 हजार 576 शेतकरी पात्र करण्यात आले आहे. 

Leave a Comment