तुमच्या अनुदानाची स्थिती ऑनलाईन चेक करा । शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत e panchnama payment

e panchnama payment  शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत व पुनर्वसन विभागाकडून दिली जाणारी मदत कोणत्या बँक खात्यात जमा झाली आहे. शेतकऱ्याला अनुदानाचा वितरण झालेले आणि आपल्या अनुदानाची नेमकी स्थिती काय आहे हे शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने आतापर्यंत पाहता येत नव्हतं आणि याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी आता एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे. 

 

तुमच्या अनुदानाची स्तिती पहा

अधिकृत पोर्टल 

 

ज्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता स्वतःच्या अनुदानाची स्थिती काय केवायसी केलेली आहे ? त्या अनुदानाचा वितरण झालेले का ? किंवा किती अनुदान आहे ? आणि वितरण झालेलं नसेल तर ते कशामुळे वितरण झालेले नाही ? हे सर्व ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.

e panchnama payment
e panchnama payment

मित्रांनो यापूर्वी कारण विचारण्यासाठी बँकेत जावा लागत होत. तलाठ्याला भेटावं लागत होतं तहसीलमध्ये जावं लागत होतं आता एक कुठलीही प्रक्रिया करण्याची गरज नाही. आता आपल्या ऑनलाइन पद्धतीने हे स्टेटस चेक करून त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम असेल जे काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती आपण या ठिकाणी आता करू शकता. त्याचा पाठपुरावा करू शकता मित्रांनो याच्यासाठी एक वेबसाईट एक पोर्टल बनवण्यात आलेले आहे. 

विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून निविष्ठ अनुदान दिला जातो. याच्यामध्ये दुष्काळ असेल अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल किंवा गारपीट असेल अशा विविध बाबींमुळे जर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झालं जमीन वाहून गेली खडून गेले अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक वेळचं निविष्ठ अनुदान शासनाच्या माध्यमातून दिला जातं.

याच्यासाठी आपण पाहिले की वेगवेगळे जीआर काढून निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना आता या अनुदान मिळवण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक देऊन केवायसी करून या अनुदानाचा वितरण केला जात आहे.

या पोर्टल वरती आपल्याला यायचंय या पोर्टल वरती आल्यानंतर आपल्याला अवकाळी असेल गारपीट असेल किंवा इतर काही नैसर्गिक आपत्तीसाठी ज्या यादीमध्ये आपलं नाव आलं असेल त्या यादीमध्ये आपल्याला दिलेला जो काही विशिष्ट क्रमांक असेल तो विशिष्ट क्रमांक एंटर करायचं आणि विशिष्ट क्रमांक एंटर करून आपल्याला सर्च करायचे हे सर्च केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपलं नाव आपल्या जे काही अनुदानाची रक्कम आहे हे सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल.

Leave a Comment