Keli Pik Vima या जिल्ह्यातील शेतकऱयांना केळी पिक विमा जमा होण्यास सुरुवात

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आज पासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पिक विमा 2022 चा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी खरीप 2022 चा पिक विमा प्रलंबित होता आज पासून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती खासदार उमेश पाटील यांनी दिलेले आहेत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया.

केळी पिक विमा सन 2022 मध्ये 12300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा विमा क्षेत्र कमी जास्त झाल्यामुळे विमा नुकसान भरपाई प्रलंबित होती. अंदाजे रु.50 ते 55 कोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली असल्याची माहिती दिली. याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

https://x.com/UnmeshBPatil/status/1795028285661012104

खासदार उमेश पाटील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे तर त्यांनी म्हटले की केळी पिक विमा सन 2022 मध्ये 12300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा विमा क्षेत्र कमी जास्त झाल्यामुळे विमान नुकसान भरपाई प्रलंबित होती अंदाजे रुपये 50 ते 55 कोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली असल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे.

याच्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील १२३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती केळी पिक विमा आज पासून जमा होण्यास सुरुवात झालेले आहे. याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 

Leave a Comment