पीक कर्ज फक्त 1 रुपयात 1.60 लाख रुपयांपर्यंत नवीन नियम लागू Pik Karj new rule

पीक कर्ज फक्त एका रुपयामध्ये एक लाख 60 हजार रुपयापर्यंत दिला जाणार आहे. नवीन नियम लागू सुद्धा झालेला आहे ही माहिती महाराष्ट्र राज्याचे सह नोंदणी महानिरक्षक व मुद्रांक अध्यक्ष नंदकुमार काटकर यांच्या माध्यमातून सविस्तर रित्या माहिती देण्यात आली आहे.  कित्येक काळापासून शेती कर्जाच्या एक लाख 60 हजार रुपयापर्यंतच्या मुद्रांक शुल्क आकारले जायचे.   

परंतु शासनाने राजपत्र प्रसिद्ध करत शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या शेती कर्जासाठी लागणारे मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. या निर्णयाची नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून अंमलबजावणी सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा भार थोडा हलका झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतकऱ्यांना एक लाख 60 हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना पाचशे रुपयांच्या स्टॅम्प ऐवजी फक्त एका रुपयांच्या तिकीटवर मिळू शकणारे याचा लाभ नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा कर्जावरील खर्च कमी होण्यास मदत होईल आणि त्यानंतर यामुळे नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त बाळ सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज संबंधित बँक शाखेकडे दिले जायचे परंतु आता, मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय झाल्यामुळे बँकांना आता मुद्रांक शुल्क न घेता शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागणार आहे.

या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून संबंधित बँकेने दिले आहेत. महाराष्ट्र राज्याचे सह नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक शुल्क अधीक्षक नंदकुमार काटकर म्हणाले की आता शेतकऱ्यांना बँकेत गेल्यावर कर्जासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. कर्जाला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचे राजपत्रही प्रसिद्ध केले असून याची अंमलबजावणी करावी असे आदेश बँकांना दिले आहेत.

मित्रांनो एक एप्रिल 2024 पासून नव्याने पीक कर्ज घेणारे शेतकरी पात्र आता शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार. नाही एक एप्रिल 2024 पासून हा नियम लागू झालेला आहे. तर केवळ एक रुपयाचे रेवेन्यू तिकीटवर पीक कर्ज दिले जाईल. ही मुद्रांक शुल्क माफी केवळ एक लाख 60 हजार रुपये पर्यंतच्या कर्जास लागू असणारे एक एप्रिल 2024 पासून नव्याने पिक कर्ज घेणारे शेतकरी यासाठी पात्र असणारे अशी स्पष्टपणे माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे.

Leave a Comment