21 जिल्हे पात्र | नुकसान भरपाई आली | हेक्टरी 13600 रुपये | पहा तुमचा जिल्हा | Avkali Anudan Batmi

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/६-३, दि.२७ मार्च, २०२३ अन्वये, राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर व निकष दि. १ नोव्हेंबर, २०२२ पासून लागू करण्यात आलेले आहेत.

नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी

येथे क्लीक करा 

राज्यात माहे मार्च-एप्रिल, २०२३ या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तेवढ्या क्षेत्राकरिता २ हेक्टर मर्यादेत विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. राज्यात मार्च, २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकन्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ते आदेश वर नमूद दि. १० एप्रिल २०२३ व दि.२१ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत. आता एप्रिल २०२३ मधील शेतीपिकांच्या

Leave a Comment