Avkali Anudan Batmi

एप्रिल, २०२३ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वर नमूद अ.क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीसाठी एकूण रु.९८०२.२७ लक्ष (अक्षरी रुपये अठ्यानव्व कोटी दोन लक्ष सत्तावीस हजार फक्त) इतका निधी सोबतच्या प्रपन्नात दर्शविल्यानुसार जिल्हानिहाय वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म-१५
यांनी आवश्यकतेनुसार हा निधी वितरित करावा. सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी वर नमूद अ.क्र.१ येथे
नमूद दि. २४ जानेवारी, २०२३ अन्वये सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत असलेल्या शेतीपिकांच्या
नुकसानीच्या सर्व लाभार्थ्याची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. ही
माहिती भरतांना द्विरुक्ती होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाचे पालन होईल याची
खात्री करण्यात यावी.