Bandhkam kamgar 51000 anudan

हा ऑनलाइन अर्ज बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर करावा लागेल. अर्ज सबमिट करताना काही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे एकदा तुमच्याकडे ती कागदपत्रे तयार झाल्यानंतर, ऑनलाइन अर्ज सबमिट करणे सुरू करा. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • मुलीच्या विवाहाचे प्रमाणपत्र अर्थात marriage certificate
  • मुलीचे राशन कार्ड.
  • आधार कार्ड.
  • मुलीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.

वरील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ठेवा कारण ऑनलाईन shadi anudan maharashtra अर्ज करतेवेळी हि कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आता ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑनलाइन अर्ज करणे खूप सोपे आहे. तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर तुमच्याकडे बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक आहे, हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्यासाठी अर्ज कसा करायचा हे तुम्ही खालील व्हिडिओ देखील पाहू शकता.

ऑनलाईन अर्ज करण्याची खालील पद्धत आहे.

  • गुगलच्या सर्चबार मध्ये बांधकाम कामगार असा शब्द टाईप करा.
  • बांधकाम कामगार विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर New Claim हा पर्याय निवडा.
  • बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन क्रमांक टाका आणि प्रोसिड टू फॉर्म या बटनावर क्लिक करा.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या चौकटीत टाका आणि Validate OTP या बटनावर क्लिक करा.
  • जसे हि तुम्ही Validate OTP या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा किंवा दिलेल्या पर्यायामधून निवडा.