राज्यात सन २०२१ व 2022 या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत राज्यात सन २०२१ व २०२२ या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे. तथापि, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते. crop insurance maharashtra
Table of Contents
Toggleनुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या. सर्व विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्र. २ ते २५ येथील पत्रान्वये हे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. हे प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.३१ मार्च, २०२३ रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते. या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. crop insurance status