result dates

विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या. परिणामी, दहावी-बारावीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला. सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी, बारावीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याचे अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.