kanda-anudan-gr-pdf

शासन निर्णय दि. ०१/११/२०२३ व शासन शुध्दीपत्रक दि. ०७/११/२०२ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार कांदा अनुदान वितरणासंदर्भात तांत्रिक बाबींमुळे देयक नाकारलेल्या व सुधारीत माहिती अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असलेल्या नोंदीसाठी तसेच जिल्हा निबंधक सहकारी संस्था, जि.धाराशीव यांच्या दिनांक १७.१०.२०२३ च्या पत्रानुसार, कृषि उत्पन्न बाजार समिती- परांडा, जि.धाराशीव यांच्या कार्यक्षेत्रातील तांत्रिक बाबींमुळे नाकारण्यात आलेल्या परांडा, जि. धाराशीव येथील लाभार्थ्यांना प्रथम व दुस-या टप्प्यातील कमाल रू.२०,०००/- इतक्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय GR पाहण्यासाठी
येथे क्लिक करा

तद्नंतर वित्त विभागाने उर्वरित अनुदानाची रक्कम रू. ८४.०१ कोटी वितरीत करण्यास अनुमती दिल्यानुसार शासन निर्णय दिनांक २४.११.२०२३ अन्वये रू. १०.०० कोटी पेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या १० जिल्हयातील ज्या लाभार्थ्यांना प्रथम व दुस-या टप्प्यात रू.२०,०००/- इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरीत करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना तिस-या टप्प्यात रू. ४,०००/- इतक्या कमाल मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.