जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळण्याची चर्चा?
जुलै महिना संपला पण अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या नजरा त्यांच्या बँक खात्यांवर आहेत. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टचे हप्ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी एकत्र जमा झाले होते, त्यामुळे यावर्षीही अशीच शक्यता वर्तवली जात आहे.
कोणाला लाभ मिळणार नाही
ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, ज्या महिला उत्पन्न कर भरणाऱ्या महिला आहेत, सरकारी नोकरीत असलेल्या महिला आहेत, पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या महिला लाभार्थी आहेत त्यांना फक्त ५०० रुपये मिळतील, कारण त्यांना इतर योजनांमधून १००० रुपये मिळतात.