MahaDBT Lottery List 2024: महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची जिल्हानिहाय लाभार्थी यादी डाउनलोड करा

Mahadbt Lottery List 2024: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी निवड लॉटरी पद्धतीने करण्यात आली होती. या निवड प्रक्रियेमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, रिव्हर्सिबल प्लाऊ तसेच इतर कृषी अवजारांसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचा समावेश होता.

सन 2024-25 मध्ये विविध लॉटरी सायकलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तुम्ही देखील या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमची निवड झाली होती का, हे तपासायचे असेल तर खाली दिलेल्या अधिकृत लिंकचा वापर करू शकता.

महाडीबीटी लॉटरी यादी 2024 कशी पाहायची?

Mahadbt Lottery List 2024 महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची जुनी लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाडीबीटी योजनेच्या जिल्हानिहाय लाभार्थी याद्या

यादी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

महाडीबीटी अधिकृत पोर्टलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लॉटरी याद्यांमध्ये 2024-25 मधील विविध लॉटरी सायकलचा समावेश आहे.

महाडीबीटी लॉटरीमध्ये कोणत्या कृषी साहित्याचा समावेश होता?

  • ट्रॅक्टर
  • रोटाव्हेटर
  • पॉवर टिलर
  • रिव्हर्सिबल प्लाऊ
  • ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे
  • इतर शेती उपयोगी यंत्रसामग्री

महत्त्वाची सूचना

Mahadbt Lottery List 2024 ही पोस्ट 2024 मधील लॉटरी याद्यांसंबंधी माहिती देण्यासाठी आहे. 2025-26 पासून कृषी विभागाच्या योजनांसाठी प्रथम अर्ज, प्रथम प्राधान्य (FCFS) पद्धतीने निवड प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन लाभार्थी यादी तपासण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील नवीन निवड यादी पाहावी.

नवीन FCFS निवड यादी: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FCFSSelectedListReport

अधिक माहितीसाठी महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.