इतर पात्रता निकष:- (Other eligibility criteria)
१) कर्मचारी हा एसबीआयमध्ये पगार पॅकेज खातेधारक असावा. एसबीआय पगार खात्याच्या फायद्यांबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
२) किमान सेवा कालावधी:
सरकारी/संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी: ६ महिने
कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी: १२ महिने
३) वय: २१ ते ६० वर्षे. सरकारी/संरक्षण क्षेत्रातील सेवेतील आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकरणांमध्ये कर्जाचा विचार केला जाऊ शकतो.
घरबसल्या ऑनलाइन अर्ज करा
येथे क्लिक करा
४) किमान मासिक निव्वळ वेतन:
सरकारी/संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी: ₹ २०,०००/-
कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी: ₹ २५,०००/-
५) कर्ज रक्कम:
किमान: ₹ १ लाख
जास्तीत जास्त: ₹ ३५ लाख, जे तुमच्या EMI/NMI गुणोत्तराच्या ६५% पर्यंत आणि तुमच्या NMI च्या २४ पट, जे कमी असेल ते मिळू शकते.
६) कर्मचारी भारतीय नागरिक असावा.
७) बँकेच्या धोरणानुसार कर्मचाऱ्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असावा.