PM Kisan Yojana 2025

शेतकरी पीएम किसान (PM Kisan)  योजनेच्या अधिकृत वेबसाइट (Official Website) – https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊन लाभार्थी यादी मध्ये त्यांचे नाव तपासू शकतात. तसेच वेबसाइटला  (Website) भेट दिल्यानंतर, ‘लाभार्थी यादी'(Beneficiary List) लिहिलेल्या मोठ्या बॉक्सवर क्लिक (Click) करा. 

त्यानंतर, तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका (Block) आणि गाव निवडा आणि ‘रिपोर्ट मिळवा’ वर क्लिक करा. यानंतर, त्या गावामधील  सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी तुमच्या स्क्रीनवर दिसेल, त्या यादी मध्ये  तुम्ही तुमचे नाव शोधू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने  (Central Government) फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना  (PM Kisan Samman Nidhi) सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे, त्यांचा शेतीचा खर्च कमी करणे आणि त्यांचे उत्पन्न वाढवणे आहे.