favarni pump yojana mahadbt डीबीटी शेतकरी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी चार्जिंगचा फवारणी पंप हा 100% अनुदानावर दिला जात आहे. तर यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसा करायचा. याची थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के अनुदानावर चार्जिंगचा जो फवारणी पंप आहे तो दिला जात आहे.
त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे तर महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला येऊन जायचं आहे फार्मर लॉगिन मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन आधीच झालेले असतील तर त्यांनी आता फक्त लॉगिन करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता किंवा मग तुमचा आधार क्रमांक टाकून त्यावर तुम्ही ओटीपी मागून या ठिकाणी लॉगिन करू शकता.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिलेच या ठिकाणी कृषी विभागासमोर अर्ज करा म्हणून पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे तर कृषी विभागाच्या समोर अर्ज करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही आता घटक निवडा म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसतील तर त्यामधून ज्या घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते निवडावा लागेल तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण यामधून आपल्याला बाब निवडायची आहे तर त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण समोर या ठिकाणी बाबी निवडा म्हणून पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करावे.
तर त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तो अतिशय काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे. तर कशाप्रकारे ही माहिती भरावी ते थोडक्यात पाहूयात तर मुख्य घटक यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिलेले असतील त्यापैकी कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या पर्यायावर क्लिक करावे.
यावर क्लिक केल्यानंतर तपशील हा एक पर्याय तुम्हाला समोर दिसेल त्यावर क्लिक करावे त्यावर मनुष्य चलीत अवजारे म्हणून एक पर्याय दिलेले आहे. त्यावर क्लिक करून घ्यावे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामधून तुम्हाला आता एक ऑप्शन निवडायचा आहे तर यामध्ये पीक संरक्षण अवजारे असा पर्याय दिलेला आहे. त्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावं त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला मशीनचा प्रकार निवडावा लागेल.
तर यामधून आता तुम्हाला कोणता पर्याय निवडायचे ते पाहूयात तर यामधून दोन पर्याय आहेत पहिलं म्हणजे बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस पिकासाठी आणि बॅटरी संचलित फवारणी पंप गणित सोयाबीन वगैरे इत्यादी पिकांसाठी तर आपण या ठिकाणी गणित धान्यासाठी बॅटरी संचलित फवारणी पंप हा पर्याय निवडून येत सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावी आणि लक्षात असू द्या तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी खरेदी करायची नाही.
पूर्वसंमती मिळाल्यानंतरच तुम्हाला ही खरेदी करायची आहे तरच तुम्हाला या ठिकाणी हे अनुदान मिळणार आहे. तर लक्षात असू द्या पूर्वसंमती तुम्हाला मिळेल त्यानंतरच खरेदी करायची त्यासाठी या कन्सेंट वर क्लिक करायचा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आता जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी होम पेजवर यायचा या ठिकाणी पुन्हा एकदा अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमचा अर्ज जो आहे तो सादर करू शकता.
तर लक्षात असू द्या तुम्ही जर या आधीच जर तुमचा जो घटक जर आधी निवडलेले असतील तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करायची गरज नाही आणि जर नव्याने घटक जुळत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करावे लागेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही चार्जिंगच्या फवारणी पंपासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता यासाठी 100% अनुदान आणि उपलब्ध आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यावा.