Free Flour Mill Yojana Maharashtra | महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी | अर्ज सुरु | कागदपत्रे

Free Flour Mill Yojana Maharashtra महाराष्ट्र राज्यातून मोफत पिठाची गिरणी योजना आहे. या योजनेत अनुसूचित जमाती/जातीच्या महिलांसाठी पिठाची गिरणी घेण्याचे संधी दिले जाते. गिरणीच्या कोटेशन/बिलावर ९०% सब्सिडी दिली जाते. रक्कमाचा १०% भाग लाभार्थ्याला भरायचा असतो. या गिरणीचा उपयोग महिलांनी स्वतःच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो. त्यामुळे रोजगार मिळताना महिलांच्या जीवनातील स्तर वाढतो. महिलांनी आत्मनिर्भर व्हावं यासाठी ही योजना सुरू केली गेली आहे.

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
या योजनेसाठी अर्ज करताना आपल्याला खलील कागदपत्रांची आवश्यकता आहे :

 • विहित नमुन्यातील मागणी अर्ज
 • आधार कार्ड
 • जातीचा दाखला
 • रेशनकार्ड
 • पीठ गिरणी खरेदीसाठी प्रमाणित रिपोर्ट
 • उत्पन्न दाखला
 • रहिवासी दाखला
 • बँक पासबुक
 • वीजबिल
 • पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
 • मोबाईल क्रमांक
 • दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा
 • व्यवसायासाठी जागेचा “८ अ नमुना”

मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता

 • या योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्रात राहावा.
 • अनुसूचित जाती / जमातीसाठी सूचीत महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
 • महाराष्ट्रातील गावांत राहणारी महिलांनी मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेता येईल.
 • कुटुंबाची एकूण वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास त्या कुटुंबातील महिला मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
 • आर्थिक दृष्टीने गरीब असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.
 • मोफत पिठाची गिरणी योजनेसाठी १८ ते ६० वयोगटातील मुली/महिला पात्र आहेत.

मोफत पिठाची गिरणी अर्ज कसा करावा
मोफत पिठाची गिरणी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. हा अर्ज आपल्याला ग्रामपंचायत किंवा जिल्हापरिषद येथे उपलब्ध असतो. काही अर्जाचे नमुने ऑनलाईन उपलब्ध आहेत. आपण ते डाऊनलोड करून प्रिंट मारून अर्ज भरू शकता.

Leave a Comment