How To Check Traffic Challan Of Your Vehicle Online echallan.parivahan.gov.in ट्रफिक पोलिस चा तुमच्या गाडी वरील दंड ऑनलाइन कसा पहायचा

Maharashtra Traffic Challan Payment नमस्कार मित्रांनो बरेचदा आपल्यामुळे नकळत वाहतूक नियम मोडले जातात. आपण सिग्नल मोडतो कधी हेल्मेट घालत नाही कधी सीट बेल्ट लावत  नाही व बरेच वेळा आपल्यावर आपल्याला माहीत नसताना देखील चलान लागते. आपण आपली गाडी एखाद्या परिचित व्यक्तींना दिल्यास कधी कधी तोही आपल्याला सांगत नाही की आपल्या गाडीवर काहीतरी दंड आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कधीच माहीत होत नाही की आपल्या गाडीवर कुठला चलान तर नाही ना. तर ते आपण एका मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो.

इ चालान हे पोर्टल महाराष्ट्र सरकारने सुरू केले असून याच https://echallan.parivahan.gov.in/ पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमच्या

 • डीएल क्रमांक (Driving Licence Number) किंवा
 • वाहन क्रमांक (Vehicle Registration Number)
 • चालन क्रमांक (Challan Number) (जर तुम्हाला माहिती असेल)

टाकून तुमच्या गाडीवर कुठला दंड किंवा फाईन आहे की नाही व त्याची स्थिती चेक करू शकता, ते चेक करण्यासाठी तुम्हाला इ चालान ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तेथे तुम्हाला तुमच्या गाडीचा नंबर किंवा चेचेस नंबर किंवा चालान नंबर टाकावा लागणार. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करून एक ओटीपी येणार ओटीपी आल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या गाडीवर चालन असेल तर तिथे त्याची पीडीएफ तुम्हाला तिथे पाहायला मिळणार.

गाडीवरील फाईन चेक करण्यासाठी
येथे क्लिक करा 

हे देखील नाही तर त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला तुमचं चालन कुठे फाटलं आणि त्या चलांमध्ये तुम्ही नियमांचे उल्लंघन करताना चा फोटो देखील तुम्ही तिथे पाहू शकता. तर मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.

 • तुमच्या वाहनावर कोणतेही ई-चालन लागले असल्यास, त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल. हे माहिती समाविष्ट करेल:
  • चालन क्रमांक
  • चालन तारीख
  • वाहन क्रमांक
  • गुन्हा
  • दंड रक्कम

Leave a Comment