या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा 2023 मंजूर 118 कोटी निधी वितरित लाभार्थी यादी पहा buldhana district pik vima

buldhana district pik vima  नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील खरीप हंगाम 2023 24 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आली आहे. मित्रांनो राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण पिक विमा कंपनीकडून खरीप हंगाम 2023 च्या पिक विमा रकमे कोटी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण 118 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.

यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय कुटे यांनी याबाबत माहिती दिली आहे. मित्रांनो याविषयी सविस्तर माहिती देताना डॉक्टर संजय कुटे म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा 118 कोटींचा खरीप पिक विमा येत्या काही दिवसात खात्यात जमा होणार बुलढाणा जिल्ह्याचा पिक विमा फडफिक विमा योजना अनुदानाबाबत आणि अंमलबजावणी बाबत माझ्या उपस्थितीत राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या जालनात दिनांक 20 जून रोजी बैठक पार पडली.

पीकविमा पूर्ण गावाची यादी पहा

पीक विमा यादी 

या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये सन 2023 24 च्या खरीप पिक विम्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा मार्गी लागला असून या महिन्याच्या शेवटी खरीप पिक विम्याची 118 कोटी ची रक्कम ही बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे पिक विमा कंपनीने मान्य केले आहे त्यामुळे खरीप पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर तसेच संत्रा मूग बहार फळपीक विमा योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी तब्बल सहा कोटी 47 लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मित्रांनो यापैकी 113 शेतकऱ्यांचे आधार नंबर पडताळणी सुरू असून त्यांची 44 लक्ष रुपयांची मदत ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तात्काळ दिल्या जाईल अवकाडी पावसामुळे गहू हरभरा यासारखी रब्बी पिके खराब झाली होती त्यावेळी अनेक शेतकरी बांधवांचे प्रस्ताव पिक विमा कंपनीने अपात्र केले होते, याबाबत सुद्धा या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून सदर मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली या बैठकीला कृषिमंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक ढगे आणि पिक विमा कंपनीचे अधिकारी हे उपस्थित होते.

अशा प्रकारे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा 2023 मंजूर करण्यात आला आहे तोही 118 कोटी रुपयांचा आणि लवकरच हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Leave a Comment